श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना-विधीच्या वेळी मिळालेल्या दैवी प्रचीतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्याला बळ पुरवण्यासाठी श्री भवानीदेवी सनातनच्या आश्रमात विराजमान झाली. प्रतिष्ठापना-विधीच्या वेळी मिळालेल्या दैवी प्रचीतींच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

श्री. यशवंत कणगलेकर

१. मंदिर परिसरात खेकडा आढळल्याने ‘या वर्षी पर्जन्यवृष्टी पुष्कळ प्रमाणात होईल’, असा संकेत मिळणे

श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना-विधीची पूर्वसिद्धता चालू असतांना सकाळी ९.१५ वाजता तेथील मंदिर परिसरात एक ‘खेकडा’ आढळला. त्यावेळी गोचर (तत्कालिक) कुंडलीत प्रथम स्थानात ‘कर्क’ रास उदित होती. कर्क ही जलतत्त्वाची रास आहे. कर्क राशीचे बोधचिन्ह ‘खेकडा’ असून खेकडा एक जलीय जीव आहे. अत: ‘या वर्षी पर्जन्यवृष्टी पुष्कळ प्रमाणात होईल’, असा संकेत या प्रचीतीतून मिळातो.

२. प्रतिष्ठापना-विधीच्या अंतर्गत संकल्प-विधी चालू असतांना फणसाच्या झाडावरील एक फळ आश्रमाच्या आवारात खाली पडल्याने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट श्री भवानीदेवीच्या कृपेने टळले’, असा संकेत मिळणे

सकाळी ११.४९ वाजता श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना-विधीच्या अंतर्गत संकल्प-विधी चालू होता. त्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागून असलेल्या फणसाच्या झाडावरील एक फळ आश्रमाच्या आवारात खाली पडले. त्यावेळी गोचर (तत्कालिक) कुंडलीत प्रथम स्थानात ‘सिंह’ रास उदित होती. सिंह राशीचा स्वामी रवि ग्रह असून तो आरोग्याशी संबंधित ग्रह आहे. फणसाचे झाड हे ‘उत्तराषाढा’ नक्षत्राशी संबंधित आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा असून त्यांची जन्मरास मकर आहे. मकर राशीकडून सिंह रास आठवी म्हणजे अष्टम (मृत्यू) स्थानात येते. अत: ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट श्री भवानीदेवीच्या कृपेने टळले’, असा संकेत या प्रचीतीतून मिळतो.’

– श्री. यशवंत कणगलेकर, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.