सोलापूर, १० ऑक्टोबर – ९ ऑक्टोबर या दिवशी भाविकांना ‘धर्मदर्शन’ (श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी केलेली एक बहुमजली व्यवस्था. एक एक मजला उतरत शेवटी देवीच्या गाभार्यात दर्शन मिळते.) केवळ एका घंट्यात मिळत होते. सशुल्क दर्शनाचे दर ३०० रुपये प्रतिव्यक्ती असल्याने भाविकांनी सशुल्क दर्शनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नवरात्रोत्सवाच्या तिसर्या-चौथ्या दिवशी, म्हणजेच ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार पूजा भाविकांसाठी खुली होती.
प्रक्षाळ पूजेसाठी सर्व शहरवासियांना ‘आधार कार्ड’ पाहून राजमाता जिजाऊ महाद्वारातून मंदिरात सोडण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. ‘आधार कार्ड’ आणि कलश पाहून मंदिरात सोडण्यात येणार आहे. यामुळे नवरात्रीत ९ दिवस प्रक्षाळ पूजेच्या वेळी स्थानिकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे.