११ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (आज पाचवा दिवस)
सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ।।
सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ।।
मद्रास उच्च न्यायालयाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक राज्यामध्ये असा आदेश दिला गेला पाहिजे ! देशात पुतळ्यांची विटंबना केल्यामुळे दंगली घडल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्याला अशा प्रकारच्या ‘पार्क’मुळे चाप बसेल !
सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, धर्माचरण, दैनंदिन आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवर अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथांचे दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालवण्यात येत आहे.
हाच प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनीही विचारला, तर आश्चर्य वाटू नये ! स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर देशभक्त आणि अखंड भारताचे पाठीराखे होते. त्यामुळे फाळणीला मान्यता देणार्या गांधी यांच्या शेजारी यांचे छायाचित्र लावणे हा त्यांचा अवमानच आहे, असेच कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नसल्याचे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी बोलतांना काढले.
मुंबई विद्यापिठाच्या ‘कलिना कॅम्पस’मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ चालू करण्यासाठी राज्यशासनाकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर ७ मास होऊनही विद्यापिठाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणी कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर राजकारण करत असल्याचा आरोप युवा सेनेच्या सदस्यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेत केला.
कालव्याकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांकडूनच शेतकर्यांची हानीभरपाई वसूल करा !
जेव्हा नवाब मलीक यांच्या जावयाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली, तेव्हा नवाब मलीक का गप्प होते ? आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आर्यन शाहरुख खानची चिंता आहे कि अमली पदार्थ विक्री करणार्या टोळक्यांची चिंता आहे ?, असा प्रश्न भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
‘क्रूझ’वर अटक करण्यात आलेला ऋषभ सचदेव हा कंबोज यांचा मेव्हणा आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी कंबोज यांनी प्रसारमाध्यमांकडे त्यांची वरील भूमिका मांडली.