कोरोनाचे सावट कायमस्वरूपी जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना !

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर सौ. किशोरी पेडणेकर याही या वेळी उपस्थित होत्या.

‘आई राजा उदो उदो’च्या गजरात श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात घटस्थापना !

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर उघडल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह !

मुंबईतील ६ किल्ल्यांचा एकत्रित विकास आराखडा सादर करावा ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

गड-किल्ले यांच्या संवर्धनाविषयी ५ ऑक्टोबर या दिवशी अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

‘जरंडेश्वर’चा खरा मालक कोण आहे ? – किरीट सोमय्या, भाजप नेते

अजित पवारांमध्ये धैर्य असेल, तर मुख्य न्यायाधिशांसमोर जाऊन काय ते सांगावे, असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

आयकर विभागाकडून अजित पवारांशी संबंधित साखर कारखान्यांवर धाडी !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आणि निकटवर्तियांच्या साखर कारखान्यांमध्ये आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील बस देवचंद महाविद्यालय परिसरात न सोडल्यास कर्नाटकातून येणारी वाहने कागलमधून सोडणार नाही ! – संभाजीराव भोकरे, शिवसेना

काही दिवसांपासून कर्नाटक राज्याचे पोलीस निंगनूर नाका येथे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसला देवचंद महाविद्यालय परिसरात प्रवेश देत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना ५ किलोमीटर चालत जावे लागते.

जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिदिन २० सहस्र भाविकांना दर्शन मिळणार !

भाविकांना दर्शन रांगेतूनच योग्य ते अंतर ठेवत केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. १० वर्षांखालील मुले-मुली आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच गर्भवती स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात बाँब ठेवल्याचा निनावी दूरभाष !

राज्यातील ७ ऑक्टोबरपासून सर्व मंदिरे उघडल्याने, तसेच श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी होती.

केंद्रशासनाकडून गोव्याला वस्तू आणि सेवा करापोटी २१३ कोटी रुपये

गोव्याला केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराचा (जी.एस्.टी.चा) वाटा म्हणून २१३ कोटी ९ लक्ष रुपये मिळाले आहेत. या निधीचा वापर राज्यशासन आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी करू शकणार आहे.

चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चा कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राला लाभ होणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाविषयी, तसेच त्यातील अडचणी सोडविण्याविषयी ७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ‘दूरदृश्य प्रणाली’द्वारे बैठक झाली.