६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक प्रभाकर पिंगळे (वय ८६ वर्षे) यांचे निधन

श्री. प्रभाकर पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे वडील, तसेच ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक प्रभाकर पिंगळे (वय ८६ वर्षे) यांचे ३० सप्टेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले. प्रभाकर पिंगळे हे खामगाव (जिल्हा बुलढाणा) या गावचे रहिवासी होते. ते सध्या ढवळी, फोंडा, गोवा येथे रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमलिनी, २ मुलगे, सुना, १ विवाहित मुलगी, जावई, १ नातू आणि ३ नाती, असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सून आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे, नात सौ. वैदेही गौडा आणि नातजावई श्री. गुरुप्रसाद गौडा हे पूर्णवेळ साधक आहेत. सनातन परिवार पिंगळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.