सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कह्यात !

समाजाची नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा अल्प होत चालल्याचे उदाहरण ! रामराज्याप्रमाणे आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता आहे.

अतीवृष्टीमुळे ‘सीईटी’ परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोचू शकले नाहीत. यामुळे ‘सीईटी’ची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

सुकाणू समितीचे सदस्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली गड आणि किल्ले यांच्या दुरवस्थेची माहिती !

गड आणि किल्ले यांची दुरवस्था लवकर दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी !

कोरोनाऐवजी रेबीजची लस दिल्याप्रकरणी आधुनिक वैद्या आणि परिचारिका निलंबित !

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा !

१ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी १० रुपयांना देण्याचा शासनाचा निर्णय !

कोरोनाच्या कालावधीत गरीब आणि निराधार नागरिकांपैकी कुणी उपाशी राहू नये, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी विनामूल्य देण्याचे घोषित केले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन याची समयमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती

नवीन महाविद्यालये आणि अभ्यासक्रम चालू करण्याला १ मास मुदतवाढ !

नवीन महाविद्यालय, तसेच अभ्यासक्रम चालू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोरोनामुळे १ मास पुढे ढकलण्याचा निर्णय २८ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या गायकाच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर त्याच्याकडून भारतियांची क्षमायाचना !

भारताच्या राष्ट्रगीताच्या चालीवर चुकीचा शब्दप्रयोग करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी संबंधिताच्या विरोधात पोलिसांत तक्रारी प्रविष्ट झाल्यावर संबंधित गायकाने समस्त भारतियांची क्षमा मागितली आहे.

प्रभादेवी (मुंबई) येथील हिंदसायकल गणेशोत्सव समितीकडून आदर्शरित्या गणेशोत्सव साजरा !

प्रभादेवी येथील हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही धर्मशास्त्राला अनुसरून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

‘आयुष आपके द्वार’ मोहिमेअंतर्गत उगवे, पेडणे येथे औषधी वनस्पतींचे वाटप आणि लागवडीविषयी मार्गदर्शन

आयुष मंत्रालयाच्या ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र पश्चिम विभागा’च्या वतीने उगवे, पेडणे येथे औषधी वनस्पतींचे वाटप आणि लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आजूबाजूच्या गावातील सुमारे २५ शेतकरी उपस्थित होते.

पूरस्थितीची पहाणी करण्यास गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वागत मिरवणुकीत व्यस्त !

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील अन् सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात अतीवृष्टीने झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी बीड जिल्ह्यात गेले होते. या वेळी परळी येथील नागरिकांनी पाटील यांचे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.