मुंबई – राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीची नियमावली सिद्ध करण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ‘टास्क फोर्स’चे सदस्य, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, खासदार संजय राऊत यांसह सुबोध भावे, मकरंद देशपांडे, आदेश बांदेकर, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी आदी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील मंडळी उपस्थित होती.