ग्रामीण भागात इयत्ता ५ वीपासून, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.

शाळा चालू करण्यापूर्वी आजारी मुलांना कसे शोधायचे ? याविषयी ‘टास्क फोर्स’कडून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासह पालकांनी कोणती काळजी घ्यायची ? याविषयीही माहिती दिली जाणार आहे, असे या वेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले.