सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले काही मास नियंत्रणात असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ७१ नवीन रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ३९५ झाली आहे. २५ सप्टेंबर या दिवशी १८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्य:स्थितीत १ सहस्र १०७ रुग्णांवर उपचार चालू आहेत.