धर्मादाय सहआयुक्तांनी मागितले देवस्थानांच्या भूमींचे तपशील !

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्याकडील देवस्थानांच्या भूमींच्या संदर्भात योग्य ते निर्देश द्यावेत, असेही बुके यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

गोवा आदर्श निर्यात केंद्र बनवण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावेत ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

दोनापावला येथील ‘गोवा इंटरनॅशनल सेंटर’मध्ये ‘वाणिज्य उत्सव’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी !

राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असली, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी समाप्त झाला आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय आरक्षणानुसार नव्याने अर्ज भरण्यात येणार का ?

२५ सप्टेंबरला कराड येथे विविध रस्त्यांच्या कामांचा कोनशीला अनावरण आणि लोकार्पण समारंभ !

२५ सप्टेंबरला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कराड येथे विविध रस्त्यांच्या कामांचा कोनशीला अनावरण अन् लोकार्पण समारंभ होणार आहे. हे लोकार्पण दुपारी ३ वाजता राष्ट्रीय महामार्ग ४८, ‘हॉटेल द फर्न’ येथे होणार आहे.

डोंबिवली येथे २९ जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

असुरक्षित डोंबिवली शहर ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही.

‘उस्मानाबाद’ जिल्ह्याचे मूळ ‘धाराशिव’ हे नाव पूर्ववत् करावे, या मागणीसाठी हिंदूराष्ट्र सेनेचे लाक्षणिक धरणे आंदोलन !

याविषयीच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘धाराशिव’ हे शहराचे प्राचीन नाव आहे. निजाम राजवटीमध्ये उस्मानअली या निजामाच्या नावावरून ‘धाराशिव’चे ‘उस्मानाबाद’, असे नामांतर करण्यात आले होते. उत्तरप्रदेश सरकारने यापूर्वीच अनेक शहरांची नावे पूर्ववत् केली आहेत.

चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वरील विमानसेवेचे आरक्षण चालू

जिल्ह्यात चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वर ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे.

विशाळगड येथील अतिक्रमण आणि मंदिरांची दुरवस्था यांविषयी विविध ग्रामपंचायतींचे ठराव घेऊ ! – युवराज काटकर, जिल्हाउपप्रमुख, मनसे

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती करत असलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही विशाळगड येथील अतिक्रमण अन् मंदिरांची दुरवस्था यांविषयी विविध ग्रामपंचायतींचे ठराव घेऊ, तसेच ठिकठिकाणी हा विषय पोचवू, असे आश्वासन श्री. युवराज काटकर यांनी दिले.

वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रात बलात्काराच्या २ सहस्र ६१ घटना उघडकीस !

बलात्काराच्या वाढत्या घटना हे समाजाच्या अध:पतनाचे लक्षण आहे ! महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याविना पर्याय नाही !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अकार्यक्षम अधिकारी आणि सांगलीतील दोषी संस्था यांच्यावर कारवाई करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सांगलीतील ‘सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी’ या संस्थेकडून प्रदूषणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे प्रकरण