कोल्हापूर, २३ सप्टेंबर – २५ सप्टेंबरला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कराड येथे विविध रस्त्यांच्या कामांचा कोनशीला अनावरण अन् लोकार्पण समारंभ होणार आहे. हे लोकार्पण दुपारी ३ वाजता राष्ट्रीय महामार्ग ४८, ‘हॉटेल द फर्न’ येथे होणार आहे. या कार्यक्रमास विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांसह अन्य उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता स.वि. सांगावकर यांनी दिली. या कार्यक्रमात एकत्रित ५ सहस्र ९७१ कोटी रुपयांच्या ४०३.१७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांचा लोर्कापण होणार आहे.