डोंबिवली येथे २९ जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

असुरक्षित डोंबिवली शहर !

ठाणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) – डोंबिवली येथे भोपर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर २९ जणांकडून बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून २४ जणांना कह्यात घेतले आहे. मुंबईतील साकीनाका, तसेच उल्हासनगर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांनी देश हादरला असतांना डोंबिवली येथे बलात्काराची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्या अश्लील चित्रीकरणावरून तिला धमकावले आणि २९ जणांनी मागील ९ मासांपासून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्राथमिक अन्वेषणातून समोर आले आहे. याप्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. (गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही. – संपादक)