पणजी – गोवा आदर्श निर्यात केंद्र बनवण्यासाठी उद्योजक आणि निर्यातदार यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दोनापावला येथील ‘गोवा इंटरनॅशनल सेंटर’मध्ये ‘वाणिज्य उत्सव’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मासेमारी, कृषी, खनिज, पर्यटन, औषधनिर्मिती इत्यादी क्षेत्रांत गोव्याची स्थिती भक्कम आहे. गोवा सरकार अधिक उत्पादनांसाठी भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.