सातारा येथे गुलाल उधळणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हा नोंद !

अशी तत्परता अन्य धर्मियांच्या बाबतीत दाखवली जाते का ? – संपादक

सातारा, २० सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरीही येथील मंडईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वाजत-गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मंडळाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे, तसेच मंडळातील हादगे, शंभूराज साळुंखे, किरण साळुंखे, ईश्वर साळुंखे, रोहित शिंदे, पराग निवळे यांच्यासह २२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी मंडलाधिकारी जयंत जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.