वर्साेवा (मुंबई) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेली ५ मुले समुद्रात बुडली

दोघांना वाचवण्यात यश !

मुंबई – १९ सप्टेंबरला अनंतचतुदर्शीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना अंधेरी येथील वर्सोवा समुद्रकिनारी रात्री ९ वाजता ५ मुले बुडली. त्यांतील २ मुलांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून उर्वरित ३ मुले अजून बेपत्ता आहेत. स्थानिक पोलीस, महापालिका, अग्नीशामक आणि तटरक्षक दल यांच्या माध्यमांतून या बेपत्ता मुलांचा शोध चालू आहे, तसेच नौदलाचेही साहाय्य घेण्यात येत आहे. श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करत असतांना ५ मुले खोल समुद्राच्या दिशेने पुढे गेली. त्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही.