कोल्हापूर येथे नियमभंग करून २१ फुटी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

कोल्हापूर – १९ सप्टेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने ४ फूट श्री गणेशमूर्तीची अनुमती असतांना नियमभंग करून २१ फुटी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढल्याने माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीही याच मंडळावर गर्दी जमवून मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. (१९ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चप्पल घेऊन कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर निदर्शने केली होती. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे कायद्याचा बडगा हा केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच उगारला जातो काय ? असे हिंदूंना वाटल्यास गैर ते काय ? – संपादक)