साकीनाका येथील महिलेवरील बलात्कार प्रकरणी एका मासात आरोपपत्र प्रविष्ट करा ! – मुख्यमंत्री

या वेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जलदगती न्याय काय असतो, ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे; जेणेकरून पुढे कुणी असे धाडस करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची सिद्धता करावी.

लव्ह जिहादच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येथे ‘ऑनलाईन लव्ह जिहाद – एक धर्मविरोधी षड्यंत्र’ या विषयावर व्याख्यान

पनवेल महापालिका क्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन वेळेची नोंदणी !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एकूण ६० ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी त्यांच्या घराजवळचे मूर्ती विसर्जन स्थान आणि वेळ निश्चित करावी.

श्री गणेशाच्या नामजपासह त्याची अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून भावभक्ती वाढवा ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

या वेळी ‘श्री गणेशाची मूर्ती शाडू मातीची आणि डाव्या सोंडेची का असावी ?’, याविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली.

जनतेला जागरूक करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जनतेच्या मनातील असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते. ‘आज आपण सर्वांनी, तसेच विविध मंडळे, संस्था यांनीही कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी; म्हणून प्रयत्न करायला हवेत

सावंतवाडी येथे मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन 

मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आले. ‘मुंबई विद्यापिठाच्या या केंद्राला भविष्यात मोठे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जावेत’, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी या वेळी केले. 

उल्हासनगर (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग, एकास अटक

शिर्डीहून उल्हासनगर येथे आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.

लोणकढी थाप !

केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !

 गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

आजपर्यंत प्रशासनाने अन्य धर्मियांच्या किती मिरवणुकांवर कोरोनाविषयक नियम मोडल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत ?

दोडामार्ग येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक दिग्विजय फडके आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.