असुरक्षित उल्हासनगर !

ठाणे, १२ सप्टेंबर (वार्ता.) – शिर्डीहून उल्हासनगर येथे आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. मुंबई, पुणे, अमरावती पाठोपाठ आता उल्हासनगर येथे ही घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर येथील ‘स्कायवॉक’वर ही पीडित मुलगी तिच्या मित्रांसमवेत उभी होती. त्या वेळी एक तरुण तिच्या जवळ आला. त्याच्या हातात हातोडा होता. या हातोड्याचा वापर करत त्याने तिच्या मित्रांना धमकावले. यामुळे ते मित्र पळून गेले. त्यानंतर त्या तरुणाने तिला बलपूर्वक निर्जन स्थळी नेले. प्रसंग घडण्यापूर्वी आरोपीने मुलीला बेदम मारहाण केली. संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जी.आर्.पी.चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण चालू झाले. पोलिसांनी आरोपी गायकवाड याला अटक केली असता त्याने गुन्हा मान्य केला असल्याचे पोलिसांकडून समजते.
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
मराठी भाषा जतन आणि संवर्धन यांसाठी प्रभावी कृती आराखडा राबवा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !