गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

आजपर्यंत प्रशासनाने अन्य धर्मियांच्या किती मिरवणुकांवर कोरोनाविषयक नियम मोडल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंद केले आहेत ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – गणेशोत्सव आगमनाच्या मिरवणुकीत कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. यात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी, ढोल वादक पथकातील सदस्य अशा १२५ जणांचा समावेश आहे. या मंडळाने बंदी असतांना पापाची तिकटी येथून श्री गणेशमूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याचसमवेत राजारामपुरी परिसरात कोरोनाविषयक नियमाचा भंग करून गर्दी करत मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (या पूर्वी कोल्हापूर शहरात गोकुळ निवडणूक असो वा झालेले अनेक राजकीय कार्यक्रम, सभा, आंदोलने येथे कोरोनाविषयक नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात आली होती. तेव्हा कुठेही त्यांच्यावर गुन्हे नोंद केल्याचे ऐकीवात नाही ! हिंदूबहुल देशात निधर्मी राज्यप्रणालीत नियम हे हिंदु भाविकांनाच लागू आहेत का ?, असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)