लव्ह जिहादच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र येथे ‘ऑनलाईन लव्ह जिहाद – एक धर्मविरोधी षड्यंत्र’ या विषयावर व्याख्यान

जळगाव – नागपूर येथे ४ दिवसांपूर्वी ‘वर्ल्ड हिजाब डे’ साजरा करण्यात आला. तेथे सकाळी फिरायला आलेल्या हिंदु तरुणींना ‘हिजाब कसा
बांधावा ?’, ‘त्याचे कसे लाभ होतात ?’, याविषयी काही मुसलमान तरुणी प्रशिक्षण देत असल्याचे आढळले. काही जागरूक हिंदूंनी यास विरोध दर्शवला. याविषयी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही प्रविष्ट करण्यात आली आहे. हिजाबचे प्रशिक्षण हिंदु तरुणींना कशासाठी ? हा लव्ह जिहादचाच एक भाग आहे. आज लव्ह जिहादरूपी राक्षस फोफावला आहे. चित्रपटसृष्टी, क्रीडा क्षेत्र यांसह गावागावांत लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लव्ह जिहादचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारतातही कठोर कायदा व्हायला हवा, तसेच हिंदूंनीही याविरोधात संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ सप्टेंबर या दिवशी ‘लव्ह जिहाद – एक धर्मविरोधी षड्यंत्र’ या विषयावर आयोजित केलेल्या
‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते.

श्री. सुनील घनवट

या वेळी नगर जिल्ह्यातील समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी ‘हिंदु युवतींना स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ याविषयी उपस्थितांना संबोधित केले. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचा लाभ ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले.

व्याख्यानाच्या प्रसारासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय

अखिल भारतीय वारकरी परिषद, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटनांचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते आणि वारकरी यांनी या व्याख्यानाच्या प्रसारकार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

१. श्री. कार्तिक नाईक, पाथरी, परभणी – कार्यक्रम आवडला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. यामुळे बर्‍याच प्रमाणात अशा घटना रोखण्यासाठी साहाय्य होईल.

२. रत्ना अत्तरदे, जळगाव – श्री. सुनील घनवट यांनी जे सांगितले त्यावरून मला ‘मुलींपर्यंत असे संदेश पोचवून त्यांना लव्ह जिहादपासून वाचवावे’, अशी प्रेरणा मिळाली. यासाठी आधी आपण सक्षम होण्यासाठी मला आधी स्वरक्षण शिकले पाहिजे. आजपर्यंत मी अशा पुष्कळ मुलींना पाहिले आहे की, त्या धर्मांध मुलांसमवेत राहून त्यांच्या घरातील देव बाहेर फेकून देत आहेत. अशांना जागृत करण्याची माझी इच्छा आहे.

३. श्री. गणेश बाबुराव आहेर, नांदगाव, नाशिक – आपल्या परम पवित्र हिंदु धर्मावरील संकटांशी दोन हात करण्यासाठी आपण सज्ज होऊया आणि जनजागृती करूया.

४. श्री. श्रीराम अंताजी पाटील, दाभाडी, मालेगाव, नाशिक – आज खर्‍या अर्थाने या पद्धतीच्या जनजागृतीची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी सजग अन् सावध असा पवित्रा घेणे आवश्यक आहे. देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल, तर आपण जातीभेद विसरून धर्मरक्षण केल्यास चांगले दिवस पाहू अन्यथा धोका आहे. जय श्रीराम !

५. रितेश अग्रवाल, जालना – लव्ह जिहादच्या विरोधात हिंदूंची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे.

६. श्री. संजय पचारिया, मालेगाव, नाशिक – लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींना धार्मिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणे, कौटुंबिक प्रेम देणे, धर्मद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका अन् हिंदी चित्रपट यांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

७. सौ. रूपाली वाघ, जळगाव – ‘लव्ह जिहादपासून हिंदु मुलीना कसे वाचवले पाहिजे ?’, यावर शाळा आणि महाविद्यालये येथील मुली, तसेच प्रत्येक समाजात प्रशिक्षण दिले पाहिजे. पालकांनाही मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. या कार्यक्रमाने भरपूर लोक जोडले गेले. त्यामुळे युवा पिढी जागृत होईल.

८. श्री. मनोज नाले, बेळी, जळगाव – मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमांद्वारे ४०७ लोकांना ‘पोस्ट’ (कार्यक्रमाविषयीचे लिखाण) प्रसारित केली आणि काहींना वैयक्तिक भेटून सांगितले. त्यांपैकी बहुतांश लोक कार्यक्रमाला जोडले गेले. त्यामुळे मनाला एक समाधान वाटले की, मी माझ्या धर्मासाठी काही केले आणि यापुढेही प्रयत्न करीन.

९. श्री. अमोल शिंदे, नगर – या व्याख्यानामुळे डोळे उघडले. श्री. सुनील घनवट यांनी वादळापूर्वीची शांतता दाखवून दिली आहे. आपल्या धर्माविरुद्ध चाललेली कारस्थाने उघडण्याचे कार्य करत राहू.

लव्ह जिहादच्या विरोधातील ‘ट्विटर ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर ८ व्या क्रमांकावर !

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांतील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांनी एकत्रितपणे ‘#save_hindu_girl’ या नावाने एक ‘ट्विटर ट्रेंड’ ५ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ ते ७ या वेळेत घेण्यात आला. हा ‘ट्रेंड’ राष्ट्रीय स्तरावर ८ व्या क्रमांकावर १ घंटा होता.

वैशिष्ट्यपूर्ण

१. पाचोरा येथील ‘ध्येय न्यूज चॅनेल’ आणि धुळे येथील ‘एम्.एच्.टिव्ही’ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले.

२. हा कार्यक्रम ८ सहस्रांहून अधिक लोकांनी पाहिला.

३. या व्याख्यानामुळे ‘एच्.जे.एस्. जळगाव’ (Hjs jalgaon) या यूट्यूब चॅनलची सदस्यसंख्या ५०० नी वाढली.