श्री दासबोध अभ्यास मंडळाचे माधरावराव गाडगीळ यांचे आवाहन
मिरज (जिल्हा सांगली) – श्रावण मासातील उपासनेचा एक भाग म्हणून प्रत्येक समर्थभक्ताने श्रावण मासातील तिसर्या आणि चौथ्या शनिवारी कोरोनाच्या नियमांमुळे आपापल्या घरी १ वेळा रामरक्षा, १३ वेळा मारुतीस्तोत्र आणि १ माळ श्रीराम जयराम जय जय राम हा नामजप करावा. त्यानंतर मारुतीची आरती करून यथाशक्ती प्रसाद करून उपासनेची सांगता करावी, असे आवाहन श्री दासबोध अभ्यास मंडळ मिरज यांच्या वतीने समर्थ भक्त श्री. माधरावराव गाडगीळ यांनी केले आहे.