|

मुंबई – सातत्याने हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर टीका करणार्या हिंदी चित्रपटसृष्टीतील साम्यवादी विचारसरणीच्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी स्वतःच्या घरी श्री गणेशपूजा, श्रीसत्यनारायणपूजा, रूद्राभिषेक, यज्ञवहन आदी विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश केला. याविषयीची छायाचित्रे त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली आहेत. ‘ही पूजा ७ घंटे करण्यात आली. पुजार्याने या वेळी विविध प्रकारच्या ७ पूजा केल्या’, अशी माहितीही स्वरा भास्कर यांनी सामाजिक माध्यमांवर दिली आहे. यानंतर स्वरा भास्कर यांनी हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्या विरोधात सातत्याने केलेल्या वक्तव्यांची जाणीव करून देत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे, तर अनेकांनी त्या योग्य मार्गावर आल्याचे म्हणत त्यांचे अभिनंदनही केले आहे.
The Gods have approved! #GrihaPravesh #newoldhouse #NewBeginnings pic.twitter.com/PFptZIFUBq
— Swara Bhasker (@ReallySwara) August 26, 2021
ही छायाचित्रे प्रसारित झाल्यावर एका व्यक्तीने ‘महादेवाकडून वरदान प्राप्त करण्यासाठी पूजा करून त्याला प्रसन्न करतांना प्राचीन भारतातील एक राक्षस’, अशी टिपणी केली आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तावर केलेल्या आक्रमणाविषयी त्यांचे समर्थन करतांना स्वरा भास्कर यांनी ‘आम्ही हिंदु आतंकवादाची स्तुती करू शकत नाही. तालिबानच्या आतंकवादावर आपण मौन बाळगले पाहिजे आणि हिंदु आतकंवादावर आपला रोष व्यक्त केला पाहिजे’, असे ‘ट्वीट’ करून हिंदूंनाही ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न केला होता.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !