केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपचे नेते राम कदम यांनी पुढाकार घेऊन ही वेब सिरीज बंद पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
मुंबई – बाबरपासून औरंगजेबापर्यंत सर्व मोगल बादशहांनी भारताची लूट केली. देशभरात तांडव माजवले. अशा मोगल बादशहांवर आधारित ‘हॉटस्टार’ या ओटीटी ‘अॅप’च्या माध्यमातून ‘द एम्पायर’ ही ‘वेब सिरीज’ प्रसारित करण्यात येणार आहे. या ‘वेब सिरीज’च्या प्रसारणाला आमचा तीव्र विरोध असून त्यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
#TheEmpire नावाच्या वेबसिरीज #hotstar वर येत आहे. जे अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी आहे, या वेबसिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी!
आणि दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुगलबादशाह बद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे! – राम कदम pic.twitter.com/gtR9f8cn1C
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 27, 2021
याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना आमदार राम कदम म्हणाले, ‘‘मोगल बादशहांनी देशावर आक्रमण करून रक्तपात घडवला. मंदिरांचा विध्वंस करून लोकांवर अत्याचार केले. चित्रपटांतून या मोगलांचा जयजयकार केला जात आहे. तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप यांवर बनवा. ‘देशाच्या जडणघडणीमध्ये मोगलांचा मोठा वाटा आहे’, हे चित्रपट दिग्दर्शक कबिर खान यांचे वाक्य न पटणारे आहे. त्यांनी हे विधान त्वरित मागे घ्यावे आणि ही वेब सिरीज मागे घ्यावी.’’