भारताच्या गौरवशाली इतिहासाची अद्भुत साक्ष असलेल्या विजयदुर्गच्या इतिहासाला व्यापक प्रसिद्धी मिळणे आवश्यक !
‘कोकणकिनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. आधी याला किल्ले ‘घेरिया’ असे म्हटले जायचे. जे महत्त्व भूमीवरील किल्ल्यांमध्ये प्रतापगड किंवा रायगड यांचे आहे, तेच महत्त्व सागरी आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये ‘विजयदुर्ग’चे आहे, असे म्हणणे योग्य होईल.