रक्षाबंधन : संकल्पशक्तीचे प्रतीक

‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. ‘जसा शिव त्रिलोचन आणि ज्ञानस्वरूप आहे, तसेच माझ्या भावामध्येही विवेक-वैराग्य वाढो, त्याला मोक्षाचे ज्ञान मिळो, त्याच्या जीवनात मोक्षमय प्रेमस्वरूप अशा ईश्वराचा प्रकाश येवो, त्याच्यामधील समजूतदारपणा, यश, गांभीर्य, चारित्र्य, कीर्ती आणि त्याचे ओज-तेज अखंड राहो’, असाही ती संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.

१. या पर्वाच्या निमित्ताने भावाने धारण केलेली राखी सर्व रोग आणि अशुभ कार्ये यांचा विनाश करणारी आहे. ही राखी वर्षातून एकदा धारण केल्यामुळे वर्षभर मनुष्याचे रक्षण होते. (संदर्भ : भविष्य पुराण)

२. रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त बहीण आपल्या भावाला चांगले आयुष्य, आरोग्य आणि त्याच्या बुद्धीमध्ये वाढ होण्याच्या भावनेने राखी बांधते, तसेच आपला उद्देश आणखी उच्च बनवण्याचा संकल्प घेऊन ब्राह्मण लोक स्वतःचे यज्ञोपवित पालटतात.

३. श्रावणी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होऊ लागतो. या दिवशी जे समुद्रमार्गे व्यापार करतात, ते समुद्राला नारळ अर्पण करतात.’

(संदर्भ : ‘क्या करें, न करे ?’)