संभाजीनगर येथील सुपुत्र मेजर साकेत पाठक यांना ‘सेना मेडल’ घोषित !
पुलवामा येथे ८ एप्रिल २०२१ या दिवशी आतंकवाद्यांसमवेत झालेल्या कारवाईच्या वेळी त्यांनी दाखवलेल्या शौर्याची नोंद घेत भारतीय लष्कराच्या वतीने हे ‘मेडल’ लवकरच त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सध्या मेजर साकेत ‘४४ आर्.आर्. बटालियन’मध्ये आहेत.