- समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण – संपादक
- देशाची हानी करणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ च्या जाळ्यात न अडकण्यासाठी सतर्क रहा ! – संपादक
पुणे, १९ ऑगस्ट – चंदननगर येथील एका वायू दलातील (एअरफोर्स) निवृत्त अधिकार्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लुबाडल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा नोंद करून चौघांना अटक केली आहे. यामधील महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. तक्रारदाराच्या भ्रमणभाषवर संपर्क करून त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करून, जीवे मारण्याची धमकी देत आरती चौधरी असे नाव सांगणार्या एका तरुणीने त्यांच्याकडून बळजोरीने १० लाख रुपयांचे ३ धनादेश लिहून घेतले. त्यानंतरही आरोपींनी पैशाची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांशी संपर्क केला. या प्रकरणी चंदननगर येथील एका ५९ वर्षांच्या निवृत्त एअर फोर्स अधिकार्यांनी तक्रार दिली आहे.