गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या ! – ‘पीडियाट्रिक सिरो सर्व्हे’चा अहवाल

गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या आहेत. आरोग्य खात्याच्या ‘इंटीग्रेटेड डिसीझीस सर्व्हेलन्स’ कार्यक्रमांतर्गत ‘पीडियाट्रिक सिरो’ सर्वेक्षणात हे आढळून आले.

पिंपरी येथील लसीकरण केंद्रात महिलेची हुल्लडबाजी !

नेहरूनगर येथील लसीकरण केंद्रात महिलेने चाकू घेऊन प्रवेश करत लसीकरण करणार्‍या आशा सेविकेला खुर्चीने मारहाण केली, तसेच आरोपी महिलेने सेल्फी पॉइंटचीही तोडफोड केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर ‘ए.सी.बी.’ची धाड !

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा १८ ऑगस्ट या दिवशी पार पडली. नंतर सायंकाळी ५ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. या वेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘श्रीमंत’ नाव लावल्याने श्रीमंत होता येत नाही. विचाराने, कृतीने श्रीमंत’ असावे लागते ! – रूपाली पाटील-ठोंबरे, महिला शहराध्यक्ष, मनसे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्यात शाब्दिक चकमक चालू आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क कपात !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात कपात केली असून कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडी चालू करण्याची प्रवाशांची मागणी !

पॅसेंजर गाड्यांविषयी अद्याप कोणताही निर्णय आला नसल्यामुळे त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित गाड्या चालू करण्याचे आदेश मिळताच त्या चालू करण्यात येतील.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी शरद फडके यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन ! 

श्री. शरद फडके यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, प्रसंग, घटना या पुस्तिकेत शब्दबद्ध केल्या आहेत. या वेळी विनायक कुन्नूर, शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर उपस्थित होते.

अफगाणिस्तानमधील २ भारतीय दूतावासांचे टाळे तोडून तालिबानी आत घुसले !

त्यांनी दूतावासांमध्ये असलेल्या कपाटांमधील काही कागदपत्रांचा शोध घेतला. तालिबान्यांनी या दूतावासाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यही पळवल्या आहेत.

अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी तालिबानकडून चीनला आमंत्रण !

‘क्रौर्य’, ‘विश्‍वासघात’, ‘इतरांवर अन्याय करणे’ आदी समान ‘गुण’ असणारा तालिबान आणि चीन एकत्र आल्यास आश्‍चर्य ते काय ?

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याचा १ अधिकारी हुतात्मा, तर १ आतंकवादी ठार !

१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी पाकला मुळासकट नष्ट केले पाहिजे !