नागपूर येथील तांदूळ घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि मालक अडकण्याची शक्यता !

स्वस्त धान्य दुकानदार संघटनांच्या प्रतिनिधींकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट

संभाजीनगर येथे चोरी करून लस विकणार्‍या २ आरोग्यसेवकांचे निलंबन !

कोरोनाच्या संकटकाळात कोरोनाची लस देऊन लोकांचे जीव वाचवण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन लस देणार्‍या आरोग्यसेवकांवर बडतर्फाची कारवाई केली पाहिजे.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप करणार्‍या रोचकरी बंधूंवर अखेर गुन्हा नोंद !

रोचकरी यांच्यावर मंकावती तीर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध करणे, फसवणूक करणे यांसह अन्य कलमांसह गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करत आहेत.

सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत ! – वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे

वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी सातारा येथील धर्माभिमानी हिंदु तथा समाजसेवक विजय कृष्णा गाढवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्या बोलत होत्या.

नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक आणि कारवाईपूर्वी पलायन !

असे लाचखोर शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण काय देणार ? असे अधिकारी असणे शिक्षण विभागाला लज्जास्पदच !

बैलगाडा शर्यतीला अनुमती मिळावी यासाठी शेतकर्‍यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी रस्त्यावर ठिय्या दिला.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांकडून दंड वसूल करण्यासाठी लोकअदालतीचा पर्याय !

वर्ष २०१६ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत ई-चलानद्वारे ६८० कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी २४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम !

कठोर निर्णय घ्या !

राज्यसभेत १० ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करतांना प्रचंड गोंधळ घातला. काही खासदारांनी बाकावर उभे रहात विरोध दर्शवला. हा एकूण गोंधळ पाहून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांतून अश्रू आले…..

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

राजस्थानमधील महंदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घाट सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने घातला आहे. बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया चालू केली आहे.

महागाव (जिल्हा यवतमाळ) येथे ११ बैलांच्या हत्येचा संशय !

काळी दौलतखान ते पुसद मार्गावर मोरवाडी फाट्याजवळ ११ बैल मृतावस्थेत आढळून आले. गो तस्करी करणार्‍यांनी बैलांची हत्या केल्याची शंका गावकर्‍यांनी व्यक्त केली