निवृत्ती वेतनधारकांचे खटले निकाली काढावेत !

‘ज्येष्ठ नागरिकांचे खटले लवकरात लवकर निकाली काढण्याचे संकेत आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तरीही देशातील ‘ई.पी.एस्.-६५’च्या निवृत्ती वेतनधारकांचे खटले देशातील विविध उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांत गेल्या ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत.

ताडोबा (नागपूर) येथील गावांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस !

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या काही गावांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाची समस्या अद्यापही कायम आहे.

इंधनदराचा भडका !

कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर झालेल्या दळणवळण बंदीमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. मागील दळणवळण बंदीच्या काळात सहस्रो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आणि आता दुसर्‍या राज्यस्तरीय दळणवळण बंदीमुळे तसेच हाल होणार आहेत

सांगुळवाडी कोविड केअर सेंटरमधून पळालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या सतर्कतेमुळे त्या रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पुन्हा कोविड सेंटरमध्ये भरती केले.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ५ पोलिसांचे निलंबन मागे घेतले !

ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कार्यालयीन चौकशीनंतर ५ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना त्याच पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आजपासून तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी नदीत सोडणार

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे  धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे अतिरिक्त पाणी २१ जूनपासून नियंत्रित पद्धतीने ‘पुच्छ’ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे.

मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील नगरपंचायतीचे पाण्याचे दोन टँकर गहाळ !

जनसेवेसाठी असलेल्या वस्तूंची अशी हेळसांड करणार्‍या अधिकार्‍यांच्या वेतनातूनच ही रक्कम वसूल करायला हवी !

भिवंडी येथे एम्.एम्.आर्.डी.ए.च्या अधिकार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी ३० जणांच्या विरोधात गुन्हे नोंद !

कशेळी अन् काल्हेर या परिसरांतील अनेक इमारतींना एम्.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने अनधिकृत ठरवत मागील १५ दिवसांपासून कारवाई चालू केली होती.

प्रस्थानाच्या दिवसापर्यंत राज्य सरकारकडून पायी वारीच्या अनुमतीची आशा ! – भाऊसाहेब गोसावी, अध्यक्ष, माऊली पालखी सोहळा संघटना

आम्हाला सरकारकडून पायी वारीसाठी अनुमती मिळेल, अशी अजूनही आशा आहे; मात्र सरकारने अनुमती न दिल्यास सरकारी नियमानुसार पालखी सोहळा करणार

ठाणे येथे १०४ बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोझर, तर वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणार्‍यांवर कारवाई !

दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये पालट करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. त्यामुळे बर्‍याच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.