नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर कारवाई

ठाणे, २० जून (वार्ता.) – येथे कर्णकर्कश सायलेन्सर वापरणार्या बुलेट आणि काळी फिल्म लावणारी वाहने यांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत १०४ बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर बुलडोझर फिरवून ते कायमस्वरूपी निकामी करण्यात आले आहेत, तर वाहनांच्या काचेवर काळी फिल्म लावणार्यांकडून १२ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही अशीच कारवाई चालू रहाणार आहे. दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये पालट करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. त्यामुळे बर्याच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याविषयीच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !