सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून कोरोनावर मात करू शकतो ! – खासदार शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
एका मोठ्या संकटाचा सामान आपण सर्वजण करत आहोत. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून यावर मात करू शकतो आणि कोरोनाला हद्दपार होऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.