सांगुळवाडी कोविड केअर सेंटरमधून पळालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

दायित्वशून्य जनता !

वैभववाडी – तालुक्यातील सांगुळवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला एक परप्रांतीय रुग्ण १९ जूनला सकाळी कोविड सेंटरमधून पळून गेला; मात्र पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या सतर्कतेमुळे त्या रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पुन्हा कोविड सेंटरमध्ये भरती केले. थोड्याच वेळात वैभववाडी स्थानकात मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस येणार होती. त्या गाडीतून त्या रुग्णाने प्रवास केला असता, तर मोठा अनर्थ झाला असता; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.