अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारे सुरक्षा साहाय्य बंदच रहाणार !

सुरक्षा साहाय्य बंद करण्यासह पाकमधील जिहादी आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले पाहिजेत !

पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने मागील ट्रम्प सरकारचे धोरण कायम ठेवत पाकिस्तानला सुरक्षा साहाय्य बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०१८ मध्ये ट्रम्प सरकारने हे साहाय्य बंद केले होते.

आतंकवादाच्या विरोधातील लढाईत पाकिस्तान सहकार्य करत नसल्याचे कारण तेव्हा देण्यात आले होते.