उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याने १० सहस्र बंदीवानांना सरकार पॅरोलवर सोडणार !

सोडण्यात आलेले बंदीवान बाहेर जाऊन कोरोनाच्या काळात गुन्हेगारी कृत्य करणार नाहीत, यावर सरकारने लक्ष ठेवले पाहिजे !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने राज्य सरकारने तेथील बंदीवानांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने नियोजनबद्धरित्या १० सहस्र बंदीवानांना सोडण्यात येणार आहे.

ज्या बंदीवानांना पूर्वीही पॅरोलवर मुक्त केले होते आणि त्याचा कालावधी संपल्यावर पुन्हा कारागृहात आले होते, त्यांना प्रथम मुक्त करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य बंदीवानांचा विचार केला जाणार आहे. राज्यातील कारागृहामध्ये १ सहस्र ६०४ बंदीवानांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.