कटिहार (बिहार) येथे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडूनच कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस

  • अशा असंवेदनशील आणि समाजद्रोही कर्मचार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
  • उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गेल्या काही दिवसांपासून सतत अशा घटना घडत असल्याचे समोर येत असतांना प्रशासन त्या रोखण्याविषयी निष्क्रीय का आहे ? कि याविषयी आता न्यायालयाने आदेश दिला पाहिजे, असे त्यांना वाटते ?

कटिहार (बिहार) – येथील एका रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली आहे. बिहारमधीलच बक्सरमध्ये अनुमाने १०० हून अधिक मृतदेह गंगा नदीत आढळून आल्याची घटना ताजी असतांना हा प्रकार समोर आला आहे.

कटिहार येथील घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यामध्ये रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेह रुग्णवाहिकेतून बाहेर काढतांना आणि त्यानंतर ते नदीत टाकतांना दिसत आहेत. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीचा आदेश दिला आहे. यासह रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस बजावण्यात आली असून २४ घंट्यांत अहवाल पाठवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.