कोरोनोविषयी नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पसरवणार्‍या कोल्हापूर शहरातील तरुणाला अटक

कोल्हापूर – जगात कोरोना वगैरे काही नाही, मास्क काढा, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांद्वारे पसरवणार्‍या सुहास पाटील या तरुणाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सुहास पाटील हा गेल्या काही दिवसांपासून विनामास्क शहरातून फिरत होता. काही रुग्णालयांमध्ये कर्मचार्‍यांशीही त्याने वाईट वर्तणूक करून त्याचा ‘व्हिडिओ’ तो सामाजिक माध्यमांद्वारे पसरवला होता. महापालिकेची ‘ऑक्सिजन बस’ याने रोखली होती. त्यानंतर ‘के.एम्.टी.’ प्रशासनाच्या वतीने अशोक खाडे यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. यानंतर महामारीच्या काळात अफवा पसरवल्याच्या कारणावरून पाटील याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.