विविध उद्योगांकडे स्वतःच्या मालकीचे असलेले ऑक्सिजन सिलिंडर प्रशासन कह्यात घेणार

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग वगळता अन्य उद्योगांच्या ठिकाणी वापरात नसलेले ऑक्सिजन सिलिंडर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी सिलिंडरची कमतरता भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ‘रिफिलर्स’कडून उद्योगांना पुरवलेले; मात्र विनावापर पडून असलेले ‘जम्बो’ आणि छोटे सिलेंडर जमा करण्यात आले आहेत. ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’ पुरवठादारांनी सिलिंडर कह्यात घेऊन त्यांची नोंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.