अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात २०० बॉम्बस्फोटांत २५५ जणांचा मृत्यू, तर ५०० घायाळ

रमझान हा मुसलमानांसाठी पवित्र मास समजला जातो; मात्र त्या वेळीही जिहादी आतंकवादी त्यांच्या धर्मियांना ठार मारून आसुरी आनंद घेतात, यातून त्यांचे धर्मप्रेम किती ढोंगी आहे, हे स्पष्ट होते ! याविषयी जगातील एकही इस्लामी राष्ट्र तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात तालिबानकडून १५ आत्मघाती आणि अन्य २०० बॉम्बस्फोटांसह आक्रमणे करण्यात आली. यात एकूण २५५ नागरिक ठार झाले, तर ५०० हून अधिक जण घायाळ झाले. मागील मासाच्या तुलनेत आतंकवादी आक्रमणात मृत्यू झालेल्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे. ईदच्या पार्श्‍वभूमीवर तालिबानने ३ दिवसांच्या युद्धविरामची घोषणा केल्यावर अफगाणिस्ताने या घोषणेचे स्वागत करत त्यानेही युद्धविरामची घोषणा केली आहे.

१. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी म्हणाले, ‘मी सुरक्षादलांना धन्यवाद देतो; कारण त्यांनी ८०० हून अधिक आक्रमणे रोखली आणि ८०० हून आतंकवाद्यांना अटक केली.’

२. तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद याने ट्वीट करत म्हटले की, आम्ही पोलीस, गुप्तचर यांचे मुख्यालय आणि सैन्याच्या तळांवर नियंत्रण मिळवले आहे. अनेक सैनिकांना ठार मारले आहे, तर अनेक घायाळ झाले आहेत. अनेकांचे अपहरण केले आहे. सैनिकांचा दारुगोळा आणि वाहने कह्यात घेतली आहेत.