सर्वांनी यज्ञ करून आहुती दिल्यास कोरोनाची तिसरी लाट देशाला स्पर्शही करू शकणार नाही ! – मध्यप्रदेशच्या मंत्री उषा ठाकूर

यज्ञ-यागत सामर्थ्य आहे आणि ते करणे केव्हाही चांगलेच; मात्र त्यासह प्रत्येक भारतियाने कठोर साधना करून ईश्‍वराला आळवले, तर कोरोनाचे नव्हे, तर कुठल्याही संकटातून ईश्‍वर देशाला तारणार, हे निश्‍चित !

सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर

इंदूर (मध्यप्रदेश) – सर्वांनी यज्ञ करून त्यात आहुती अर्पण करावी आणि पर्यावरण शुद्ध करावे, असे आम्ही आवाहन करतो. ‘यज्ञ’ ही पर्यावरण शुद्ध करण्यासाठीची पद्धत असून धर्मांधता किंवा केवळ परंपरा नाही. त्यामुळे आपण सर्वांनी यज्ञात प्रत्येकी २ आहुत्या देऊन पर्यावरण शुद्ध करायला हवे. मग कोरोनाची तिसरी लाट आपल्या देशाला स्पर्शही करू शकणार नाही, असे आवाहन मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.