नातेवाइकांच्या हातात रेमडेसिविरची चिठ्ठी दिसली, तर डॉक्टरांवर कारवाई ! – धनराज पांडे, उपायुक्त

कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना चिठ्ठी लिहून हे औषध आणायला सांगू नये. १४ एप्रिलपासून कोणत्याही रुग्णाचा नातेवाईक रेमडेसिविरची चिठ्ठी घेऊन फिरतांना दिसल्यास त्याची चौकशी होईल.

साधकांनो, ‘जे घडते, ते भल्यासाठीच’, हे लक्षात ठेवून भगवंतावरील श्रद्धेने ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाचा सामना करा !

‘सध्या ‘कोरोना’सारख्या भयावह संकटाने सार्‍या विश्‍वात थैमान घातले आहे. लक्षावधी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असून सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.

कागदोपत्री वृद्धाश्रम !

जेव्हा वृद्धाश्रमांना मान्यता देण्यात आली, तेव्हा याविषयीचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले; मात्र हे सर्व कागदावरच राहिले. प्रत्यक्षात उपरोल्लेखित गावांत एकाही ठिकाणी वृद्धाश्रम अस्तित्वात आला नाही.

गुढीपाडव्यानिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या ‘ऑनलाईन’ विहंगम धर्मप्रसाराच्या कार्याला जिज्ञासूंचा उदंड प्रतिसाद !

गुढीपाडव्याचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय आहे ? धर्मशास्त्रानुसार आणि सध्याच्या आपत्काळात तो कसा साजरा करावा, हे लोकांना अवगत व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ माध्यमातून जिल्ह्यामध्ये विहंगम धर्मप्रसार चालू होता.

छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे मुंबई आणि ठाणे येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबईतील दहिसर आणि शीव येथे, तर ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रमझानच्या काळात सामूहिक नमाजपठणाची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली

‘नागरिकांचे आरोग्य हेच केंद्रस्थानी आहे’, असे नमूद करत सामूहिक नमाजपठणाच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली.

मुंबईतील रेल्वेच्या डब्यांचा वापर कोरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी होणार !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत रेल्वेच्या डब्यांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने कामाला प्रारंभ केला आहे.  

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांची मुलगी रमझानच्या काळात रोजे (उपवास) ठेवणार !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अन्य धर्मियांच्या धार्मिक कृती करून स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात; मात्र अन्य धर्मीय कधीही हिंदूंच्या धार्मिक कृतींचे पालन करून ते ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे कधीही दाखवत नाहीत.

उशिरा जागे झालेले महाराष्ट्र सरकार !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजन निर्माण करणार्‍या आस्थापनांना १०० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी देण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे.

केंद्र सरकारकडून सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित, तर बारावीच्या स्थगित

केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर  सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.