नातेवाइकांच्या हातात रेमडेसिविरची चिठ्ठी दिसली, तर डॉक्टरांवर कारवाई ! – धनराज पांडे, उपायुक्त

रेमडेसिविर इंजेशक्शन

सोलापूर, १४ एप्रिल – रेमडेसिविर इंजेशक्शन रुग्णालयांमध्येच उपलब्ध होतील. हे औषध नसेल, तर रुग्णालयांनी नियंत्रण कक्षाकडे संपर्क करावा. कोणत्याही डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाइकांना चिठ्ठी लिहून हे औषध आणायला सांगू नये. १४ एप्रिलपासून कोणत्याही रुग्णाचा नातेवाईक रेमडेसिविरची चिठ्ठी घेऊन फिरतांना दिसल्यास त्याची चौकशी होईल. या प्रकरणात संबंधित रुग्णालय आणि डॉक्टर यांच्यावर कारवाई होईल, अशी चेतावणी उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे.

उपायुक्त पुढे म्हणाले, ‘‘रेमडेसिविरच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी एक समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातूनच रुग्णालयांना रेमडेसिविर देण्यात येत आहेत.’’ कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी शहरातील आणखी ५ रुग्णालये अधिग्रहीत केली आहेत. तेथे ३० नेहमीच्या खाटा आणि ३२ ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध आहेत.