न्यूयॉर्कमध्ये चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात २ जण ठार

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील सबवेमध्ये (भुयारी मार्गामध्ये) चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणामध्ये २ जण ठार, तर २ जण घायाळ झाले. यानंतर येथे ५०० हून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. ज्यांच्यावर आक्रमण झाले, तर बेघर होते. हे आक्रमण एकाच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय आहे. ‘हे आतंकवादी आक्रमण होते का?’ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.