कटाच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी सैन्याने अनुमती दिली असल्याविषयी न्यायालयाने ले. कर्नल पुरोहित यांच्याकडे मागितले पुरावे

मालेगाव येथे बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला सैन्याच्या आदेशावरून गुप्तवार्ता मिळवण्यासाठी उपस्थित असल्याची स्वत:ची बाजू कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात मांडली आहे.

देहलीतील शेतकर्‍यांना चर्चा नाही, तर तमाशा करण्यातच रस ! – पाशा पटेल

सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला सिद्ध असतांना शेतकर्‍यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्‍न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

आज कोल्हापुरात दुर्ग परिषद ! – सुखदेव गिरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडनंतर होणार्‍या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे.

काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष ! – पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की, यूपीएच्या शासनकाळात ‘ए.पी.एम्.सी.’ कायद्यात पालट सुचवणारे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज त्याचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला करवसुलीसाठी पाठवलेल्या नोटिसीला स्थगिती

श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा सामाजिक संस्था कोणीही कर चुकवला तरी चूकच नव्हे का ?

धर्मग्रंथांनी गोसेवा आणि गोरक्षण यांना ‘पुण्यकर्म’ म्हटलेले असणे !

‘गावो विश्‍वस्त मातरः ।’ याचा अर्थ ‘गाय विश्‍वाची माता आहे.’ केवळ भारतीय आणि मनुष्य यांची नाही, तर संपूर्ण चराचर सृष्टीच्या मातेचा उच्च दर्जा वेदांनी गोमातेला दिला आहे.

आमदार-खासदारांच्या संस्थाच जिल्हा बँकेचे मोठे थकबाकीदार

जिल्हा बँकेची थकबाकी वाढतच असून आमदार-खासदारांच्या संस्थांकडे अनुमाने १ सहस्र कोटींची कर्जे आणि थकबाकी आहे. हा आकडा वाढत असतांना कारभार्‍यांनी वसुलीकडे कानाडोळा केला आहे.

मुंबईत आधुनिक वैद्यांचे अपहरण करणार्‍या टोळीला अटक

इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

खासगी क्षेत्रांना कवडीमोलाने तेल विहिरी आणि खाणी विकल्याने देशाची होत असलेली हानी

प्रमुख उद्योगपती आणि टाटा उद्योगसमूहाचे निवृत्त अध्यक्ष रतन टाटा २९ मार्च २०१३ या दिवशी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, ‘‘भारत सरकार खासगी क्षेत्रातील हितसंबंधांच्या प्रभावाखाली जाऊन भरकटले आहे. आपले ‘बजेट’ तेच ठरवतात.