भारतीय संस्कृतीचे आदि स्रोत, विश्वाच्या प्राचीन वेद आणि ग्रंथ यांनी म्हटले आहे, ‘गावो विश्वस्त मातरः ।’ याचा अर्थ ‘गाय विश्वाची माता आहे.’ केवळ भारतीय आणि मनुष्य यांची नाही, तर संपूर्ण चराचर सृष्टीच्या मातेचा उच्च दर्जा वेदांनी गोमातेला दिला आहे. सनातन धर्माच्या वेदांपासून शेवटी देवलस्मृतिपर्यंतच्या धर्मग्रंथांनी गोसेवा आणि गोरक्षण यांना ‘पुण्यकर्म’ म्हटले आहे. या कारणामुळे गोसेवा आणि गोरक्षण श्रद्धेचा विषय आहे. यासमवेत गोवधाच्या अपराध्यांना मृत्यूदंड देण्याचेही या धर्मग्रंथांमध्ये विधान आहे.
(संदर्भ – कॅलेन्डर ‘संवत्सर-सुषमा’, संवत् २०७३)