रिक्त पदे कधी भरणार ?

कृषी विभागातील रिक्त पदे भरण्याचे दायित्वही शासनाचेच आहे. एकीकडे शासन ‘डिजिटल’ भारत करण्याच्या प्रयत्नांत आहे; मात्र शेतकर्‍यांपर्यंत योजनाच पोचल्या नाहीत किंवा कार्यालयात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यास ‘डिजिटल’ हे केवळ स्वप्नच राहील.    

धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या पत्नीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये स्वत:च्या २ मुलांना मुंडे यांनी शासकीय चित्रकूट बंगल्यामध्ये डांबून ठेवले असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

न्यायालयीन चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार

२६ जानेवारीच्या दिवशी देहलीत ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे अन्वेषण सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने करावे, अशी मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

शरजील उस्मानी याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत ! – नीलेश राणे

शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायले !

३ फेब्रुवारी या दिवशी येथील महापालिकेच्या एका बैठकीत महापालिकेचे शिक्षणाचे अंदाजपत्रक सादर करत असतांना सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून ‘सॅनिटायझर’ प्यायले. पाण्याची बाटली समजून त्यांनी ‘सॅनिटायझर’ची बाटली घेतली.

यवतमाळ येथे खोटे दस्तऐवज सिद्ध करून शेतीची परस्पर विक्री

तालुक्यातील बोर्डा येथील मारोती वाभीटकर यांच्या नावे असलेल्या शेतीची खोटे दस्तऐवज सिद्ध करून परस्पर विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे या दस्तऐवजाला प्रभारी दुय्यम निबंधक जी.टी. रणमले यांनी मान्यता दिली.

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात प्राचीन भारतात केल्या जाणार्‍या शिक्षा

प्राचीन भारतामध्ये जेव्हा या शिक्षा लागू होत्या, तेव्हा कदाचित् एखादी बलात्काराची घटना घडली असेल. आज दोन व्यक्तींना जरी या शिक्षा मिळाल्या, तरी समाजातील बलात्काराच्या घटना ५० टक्क्यांनी न्यून होतील.

पॉर्न स्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अमेरिकेत होणारा वर्णद्वेषी अत्याचार, काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार यांवर हे ‘मान्यवर’ तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे नामकरण करणार !

मराठी शाळांना इंग्रजी नाव दिल्याने आधुनिक झाल्यासारखे वाटते का ? इंग्रजी नाव देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारणार, असे वाटते का ? हे सर्व अतिशय हास्यास्पद आणि मराठीचा उद्घोष करणार्‍यांसाठी लाजिरवाणे आहे !

गणेशाचे नाव असलेले मंडळ अशांना त्यांच्याकडे येऊ कसे देते ?

अलिगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने केलेली हिंदु विरोधी गरळओक पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केल्यामुळे परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे.