अमेरिकेत होणारा वर्णद्वेषी अत्याचार, काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशसंहार, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार यांवर हे ‘मान्यवर’ तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
नवी देहली – पॉप गायिका रिहानानंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकर्यांच्या आंदोलनाला ट्वीटकरून समर्थन दिले आहे. त्यांनी आंदोलन करणार्या शेतकर्यांचे छायाचित्र पोस्ट केले आहे. मिया खलिफाने म्हटले आहे, ‘मानवीहक्काचे उल्लंघन होत आहे. त्यांनी देहलीत इंटरनेट सेवा खंडीत केली आहे.’ (पोलिसांवर तलवारी उगारणार्या, त्यांच्यावर दगड फेकणार्या, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्या आंदोलनकर्त्यांविषयी सहानुभूती बाळगणार्या या मान्यवरांचा कथित मानवतावाद जाणा ! उद्या हे आतंकवाद्यांचेही समर्थन करण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत ! – संपादक)
ग्रेटा थनबर्गने ‘भारतात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत’ असे म्हटले आहे.
What in the human rights violations is going on?! They cut the internet around New Delhi?! #FarmersProtest pic.twitter.com/a5ml1P2ikU
— Mia K. (Adri Stan Account) (@miakhalifa) February 3, 2021
We stand in solidarity with the #FarmersProtest in India.
https://t.co/tqvR0oHgo0— Greta Thunberg (@GretaThunberg) February 2, 2021