
मुंबई – एक शरजील उस्मानी हिंदु समाजावर टीका करतो; पण त्याच्याविरोधात फक्त तक्रार केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत. परत अशांची हिंदु समाजाकडे वाकड्या दृष्टीने बघायची हिंमत होणार नाही, असे विधान भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘शरजील याला अटक किंवा त्याची चौकशी होणार नसेल, तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही, याचे दायित्व आमचे’, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !