पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवी !

श्री सटीदेवी आणि श्री महालक्ष्मीदेवी

पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवीची जत्रा १२ जानेवारी २०२१ या दिवशी आहे. श्री सटीदेवी नवसाला पावणारी आणि सर्वांचे रक्षण करणारी आहे. देवस्थानात श्री सटीदेवीच्या बाजूला श्री महालक्ष्मीदेवीचीही मूर्ती आहे. देवीच्या स्थानापासून जवळच एक रुग्णालय आहे. या रुग्णालयात पुरेशा सुविधा नसायच्या. त्यामुळे येथे बाळंतपणासाठी येणार्‍या महिलांना अडचणींना सामोरे जावे लागायचे. त्यानंतर काही जण श्री सटीदेवीला नवस बोलले. त्यानंतर या रुग्णालयात खूप सुविधा उपलब्ध झाल्या आणि लोकांच्या अडचणी दूर झाल्या. देवीचे स्थान औद्योगिक वसाहतीत असल्याने या ठिकाणी अनेक उद्योग आहेत. या उद्योग आस्थापनांनाही अनेक अडचणी यायच्या. त्यांच्या अडचणीही देवीला नवस बोलल्यानंतर दूर झाल्या.

देवीची जत्रा येथे खूप उत्साहात साजरी केली जाते. आजूबाजूच्या गावातील लोक येऊन ही जत्रा आनंदाने साजरी करतात. देवीला ओटी भरून लोक आपल्या मनातील मागणे मागतात. या देवीच्या जत्रेच्या निमित्ताने सकाळी श्री सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, पावणी आणि रात्री दशावतारी नाटक, असे कार्यक्रम होतात.

येथील ग्रामस्थ आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे श्री. एकनाथ गवस हे नियमित सकाळी देवतेच्या बाजूचा परिसर स्वच्छ करतात. श्री सटीदेवी हे जागृत देवस्थान असून सर्वांची इच्छा पूर्ण करणारी देवी आहे.