उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

स्वामी विवेकानंद

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही. सांप्रत आपणा सर्वांना आपाद्मस्तक राजसभाव अंगी बाणलेला आदर्श नेता हवा आहे, ज्याच्या नसानसांमधून प्रचंड चैतन्य ओसंडत आहे. असा युवक नेता हवा आहे, ज्याच्या अंगी रणांगणावरील योद्ध्याचा आदेश भरून राहिला आहे.

आयुष्याच्या रणभूमीवर सध्या आपणांस लढाऊ, शूर योद्ध्यांचे नवचैतन्य दिसायला हवे आहे. ‘आयुष्य म्हणजे मौजमजा आणि चैन करता येईल’, अशी आनंदवाटिका आहे, असे मानणारे प्रेमी लोक नको आहेत. सर्व जनतेने प्रभु श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण यांची पूजा, आराधना करावी आणि शक्तीपूजेस आरंभ करून त्याचाच ध्यास नित्य जीवनामध्ये घ्यावा. गुरु गोविंदसिंह यांच्याप्रमाणे वागा. झाशीची राणी लक्ष्मीबाईसारख्या व्हा आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्याप्रमाणे चढाओढीने देशाचे काहीतरी भले करा !’ – स्वामी विवेकानंद